‘मी सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाला बसण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सत्संगाला जाण्यापूर्वी
अ. ‘मी आश्रमातील ध्यानमंदिरात गेले. तेथील गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) छायाचित्राकडे पहातांना ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत आहेत’, असे मला जाणवले.
आ. मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या गळ्यावर त्रिशूळाचा आकार दिसला.
२. सत्संगाला आल्यानंतर
अ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना पहाताच माझी भावजागृती झाली.
आ. मला ‘माझे हात-पाय पिवळ्या रंगाचे झाले आहेत’, असे दिसले. मी त्या वेळी बाजूच्या साधकांकडे पाहिले असता त्यांचे हात पिवळ्या रंगाचे दिसत नव्हते.
इ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांकडून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत होते.
ई. मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा एक गाल पिवळ्या रंगाचा आणि दुसरा गाल गुलाबी रंगाचा दिसत होता.
उ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या गळ्यावर त्रिशूळाचा आकार आणि कपाळावर फूल दिसत होते.
ऊ. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या दर्शनाला देवता आल्या आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले.
ए. सत्संगात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव म्हणाले, ‘‘स्वभावदोष निर्मूलन सारणीत स्वतःकडून झालेल्या चुका लिहिल्याविना आपण देवाकडे जाऊच शकत नाही,’’ हे वाक्य माझ्या अंतर्मनात गेले.
३. सत्संगानंतर स्वतःमध्ये जाणवलेले पालट
अ. माझे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यासंदर्भातील सारणी लिखाण होत नव्हते. सत्संग झाल्यानंतर दुसर्या दिवसापासून मी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे सारणी लिखाण करण्यास चालू केले.’
– कु. श्रद्धा नागेंद्र गावडे (वय १८ वर्षे), रामनगर, बेळगाव.
|