कलियुगातील कलियुगी ।
भीषण आपत्काला आरंभ झाला ।।
दुःख कष्ट काळजी भय ।
वाटतसे सामान्य जिवाला ।।
काय करावे ? कोणा सांगावे ? ।
मानव गोंधळात पडला ।। १ ।।
संत ऋषिमुनी हिंदु धर्माची ।
उज्ज्वल परंपरा लाभली आम्हाला ।।
देवाला शरण जाऊनी ।
भक्तीभाव वाढवण्याचा उपाय सापडला ।।
आपत्काली भक्त प्रल्हादासम ।
भगवंतच तारील आपणाला ।। २ ।।
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७४, सनातन आश्रम, देवद, पनवेल.