धर्माचरणाची आवड आणि गुरूंप्रती भाव असलेली कुशलनगर (कर्नाटक) येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. खुशी मृत्युंजय कुरवत्ती (वय १३ वर्षे) !

(वर्ष २०२२ मध्ये कु. खुशी मृत्युंजय कुरवत्ती हिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के होती. – संकलक)

‘कार्तिक शुक्ल अष्टमी (९.११.२०२४) या दिवशी कु. खुशी मृत्युंजय कुरवत्ती हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. खुशी मृत्युंजय कुरवत्ती हिला तेराव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. खुशी कुरवत्ती

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 


पालकांनो, हे लक्षात घ्या ! 

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ 

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले     

१. ‘कु. खुशी नेहमी स्थिर असते.

२. ती विचार करून निर्णय घेते.

सौ. स्वप्ना कुरवत्ती

३. धर्माचरणाची आवड : ती प्रतिदिन कपाळाला कुंकू लावते आणि हातांत बांगड्या घालते. ती देवळात जातांना सात्त्विक पोशाख घालते.

४. गुरूंप्रती भाव   

अ. ‘जे चांगले झाले, ते गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने झाले’, असे ती म्हणते.

आ. आम्ही गुरुदेवांविषयी बोलत असतांना खुशीच्या डोळ्यांत भावाश्रू येतात.

इ. ‘गुरु स्वतःच्या समवेत आहेत’, असे तिला वाटते.

ई. एकदा मडिकेरी येथे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा होती. खुशीच्या नकळत तिच्या शिक्षकांनी तिचे नाव घेतले. तेव्हा मला वाटले, ‘ती एकटीच मेडिकेरी येथे कशी जाणार ?’ (ती कधीच सरकारी बसने एकटी कुठेही गेली नाही.) तेव्हा खुशीने मला सांगितले, ‘‘गुरु आहेत. ते काळजी घेतील.’’ नंतर तिला तिच्याच शाळेच्या बसमधून मडिकेरी येथे नेण्यात आले. तिला त्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तिथे मिळालेले एक सहस्र रुपये तिने देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर ठेवले.

५. तिच्यामधील गुरूंप्रतीच्या श्रद्धेत वृद्धी झाली आहे.’

– सौ. स्वप्ना मृत्युंजय कुरवत्ती (कु. खुशीची आई), कुशलनगर, कर्नाटक. (२४.५.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक