प.पू. भक्तराज महाराज अन् त्यांचे शिष्य डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची मुंबई येथील चि. जश्रीता मंजुनाथ पुजारी (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! 

चि. जश्रीता मंजुनाथ पुजारी, कु. खुशी मृत्युंजय कुरवत्ती आणि कु. सात्त्विक सुधींद्र राव हे या पिढीतील आहेत !

प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती उत्कट भाव

प.पू. भक्तराज महाराज

अ. आम्ही एक वर्षापासून गावी रहात आहोत. आम्ही तेथे देवघर लावत असतांना तिला देवघरात प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे छायाचित्र दिसले नाही. तेव्हा तिने आम्हाला सांगितले, ‘‘बाबा नाय आहे. बाबा आण.’’ तिचे ते बोलणे ऐकून आमची पुष्कळ भावजागृती झाली.

आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवन दर्शन’ या मालिकेतील ग्रंथ पहातांना ती प.पू. बाबांचे छायाचित्र पाहून अतिशय खुश होते. ती त्या ग्रंथमालिकेतील ग्रंथांतील गुरुदेवांच्या छायाचित्रावर डोके टेकवते.’

– सौ. सुजाता मंजुनाथ पुजारी (चि. जश्रीताची आई), मुंबई (२४.९.२०२४)

(‘जश्रीता’ हे देवी लक्ष्मीचे कन्नड भाषेतील एक नाव आहे.)

कार्तिक शुक्ल अष्टमी (९.११.२०२४) या दिवशी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. जश्रीता मंजुनाथ पुजारी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. जश्रीता मंजुनाथ पुजारी हिला दुसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद ! 

चि. जश्रीता पुजारी

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. जन्मापूर्वी

अ. ‘माझा गर्भधारणेचा अहवाल येण्यापूर्वी ४ – ५ दिवसांपासून मला अतिशय सकारात्मक आणि आनंदी वाटत होते. माझ्या मनामध्ये आपोआप ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप चालू झाला.

आ. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवानिमित्त असलेला कार्यक्रम पहाण्यासाठी मी साधकांच्या घरी गेले होते. तेव्हा तिथे मला अनेक वेळा दैवी सुगंध आला. परम पूज्यांचे श्रीरामाच्या वेशातील रूप पाहून माझी भावजागृती होत होती.

– सौ. सुजाता पुजारी

इ. या कालावधीत मला सनातनचे ग्रंथ वाचायला आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकायला पुष्कळ आवडत असे.

ई. माझा प्रसूतीकाळात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अखंड होत होता.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते सहा मास

१. जश्रीता एक मासाची असतांना आम्ही भ्रमणभाषवर लावलेला श्रीकृष्णाचा पाळणा आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी गायलेले ‘तुम्ही राम हो तुम्ही कृष्ण हो’, हे गीत तिला फार आवडत असे.

२. ती दीड मासाची असल्यापासून आम्ही दिवसभर भ्रमणभाषवर प्रभु श्रीरामाचा जप लावत होतो. तेव्हा जश्रीता हातांच्या बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा करत असे.

३. जश्रीता ५ मासांची असतांना आम्हाला गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पहाण्याची संधी मिळाली. आम्ही ‘मुंबई ते गोवा’ असा बसने प्रवास केला. या प्रवासात जश्रीताने त्रास दिला नाही. ती साधकांकडे सहजतेने जात होती. आम्ही कार्यक्रमस्थळी पोचल्यावर ती झोपली. सोहळा चालू झाल्यावर श्री गुरूंचा दिव्य रथ आमच्या दिशेने येऊ लागल्यावर ती लगेच उठली अन् जोरजोरात ओरडू लागली. ती दोन्ही हातांची मुद्रा करून कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करत होती. सोहळ्याची सांगता होईपर्यंत जश्रीता जागी होती.

२ आ. ६ मास ते २ वर्षे

१. जश्रीता सतत हसतमुख असते. तिला हृदयाशी संबंधित त्रास आहे. ती कितीही रुग्णाईत असली, तरीही ती सतत हसतमुख असते.

२. प्रेमळ : जश्रीताला घरातील एखादी व्यक्ती उदास दिसल्यास ती लगेच त्या व्यक्तीच्या जवळ जाते आणि त्या व्यक्तीला मिठी मारते.

– सौ. सुजाता मंजुनाथ पुजारी (चि. जश्रीताची आई), मुंबई

(२४.९.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJckमार्गिकेवरही पाहू शकता.