देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील कु. मनीषा शिंदे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करण्यासाठी गोव्यातील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. या प्रक्रियेच्या अंतर्गत त्या व्यष्टी साधनेचा आढावा सौ. सुप्रिया माथुर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे) यांना देत असत. आढावा देतांना कु. मनीषा शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांना झालेले आढाव्याचे लाभ येथे दिले आहेत.
१. सौ. सुप्रिया माथुर यांनी ‘व्यष्टी आढाव्यातून साधकांची प्रगती व्हावी’, या ध्येयाने आढावा घेणे
अ. ‘साधकांची व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांची घडी बसवण्यासाठीच्या प्रयत्नांमधून सौ. सुप्रिया माथुर यांची तीव्र तळमळ दिसून येते.
आ. सौ. सुप्रियाताई प्रसंगांच्या मुळाशी जायला सांगते. साधकाला जमले नाही, तर पुनःपुन्हा सांगून त्याला अंतर्मुख करते. त्यामुळे साधकांची शरणागती वाढून त्यांना आनंद मिळतो.
इ. वेगवेगळी प्रकृती असलेल्या साधकांचे आढावे घेतांना सौ. सुप्रियाताई त्या प्रसंगांशी आणि विषयांशी एकरूप झालेली असते. त्या वेळी साधकांना तीच सूत्रे आवश्यक असतात. त्यामुळे साधकांची मने चैतन्याने भारित होतात. त्यातून ‘ईश्वरी शक्ती कशी कार्यरत आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.
ई. माझ्यातील ‘इतरांचे स्वभावदोष पाहिल्यामुळे ऊर्जा व्यय (खर्च) होऊन थकवा वाढणे, मनाला मलीनता येऊन आनंदापासून दूर जाणे’ इत्यादी स्वभावदोषांची सौ. सुप्रियाताईने मला जाणीव करून दिली. त्यामुळे माझ्यातील बहिर्मुखतेचा मोठा अडथळा नष्ट झाला. इतरांकडे न पहाता मला स्वतःतील उणिवा पहायला जमून माझी सेवा अधिक परिणामकारक होऊ लागली. हे मला सौ. सुप्रियाताईकडून शिकता आले.
उ. प्रत्येक आढाव्यात सांगितलेले प्रयत्न केल्यावर साधकाने पुढच्या स्तरावरील प्रगतीसाठी प्रयत्न केले नाहीत, तर सौ. सुप्रियाताई त्याची जाणीव करून देते. त्यामुळे ‘अल्पसंतुष्टता’ हा स्वभावदोष प्रयत्नांचा आढावा देण्याच्या माध्यमातून नष्ट होतो. साधकांचे प्रयत्न करण्याविषयीचे गांभीर्य वाढते. साधकांच्या प्रयत्नांना दिशा मिळते. ‘अजून पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत’, याची साधकांना जाणीव होते.
२. तत्त्वनिष्ठेने सूत्र सांगणे
२ अ. ‘साधकांनी प्रयत्न करावेत’, यासाठी त्यांना कठोरपणे जाणीव करून दिल्याने साधकांच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळणे : चिंतनसारणीनुसार प्रयत्न झाले नाहीत, तर सौ. सुप्रियाताई त्या साधकाचा पुढचा आढावा घेत नाही. त्यामुळे साधकांमध्ये प्रयत्नांचे गांभीर्य वाढून ते सेवा आणि साधना करण्याला प्रवृत्त होतात.
सौ. सुप्रियाताई त्या साधकाचा आढावा घेत असतांना मारक तत्त्व अधिक जाणवते. सौ. सुप्रियाताईचे मुखमंडल कधी लाल, तर कधी पिवळे झालेले दिसते. त्या वेळी ‘देव ‘मंथन’ करून साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या पकडीतून मुक्त करत आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे साधकांना त्यांच्या मनावरील आवरण नष्ट होऊन प्रयत्न करण्यासाठी योग्य दिशा मिळते, तसेच साधकांची कृतीप्रवणता वाढते.
२ आ. कृतीच्या स्तरावर प्रयत्न करण्यासाठी प्रवृत्त करणे : आढाव्यात ‘कृतीच्या स्तरावर काय प्रयत्न केले ?’, असे विचारल्यावर साधक वैचारिक स्तरावर सांगायचे. ‘सौ. सुप्रियाताईने पुनःपुन्हा जाणीव करून दिल्यावर साधकांचे वैचारिक स्तरावरील सांगणे न्यून होऊन मोठा अडथळा नष्ट झाला’, असे मला वाटले. त्यातून साधकांमध्ये कृतीच्या स्तरावर प्रयत्न करण्याची जाणीव वाढली.
२ इ. सौ. सुप्रियाताई आढावा घेत असतांना तिच्यातील मारक तत्त्व जाणवणे : सौ. सुप्रियाताई आढावा घेत असतांना अनेक क्लिष्ट प्रसंग चर्चेत येत असतात. त्यांतही सौ. सुप्रियाताई पुष्कळ सहजतेने योग्य ती उपाययोजना सांगते. तिच्या अल्प शब्दांतही मारक तत्त्व जाणवते. त्यामुळे साधकांना अंतर्मुख व्हायला साहाय्य होते. साधक भावनाशील झाले, तरी सौ. सुप्रियाताई तटस्थ राहून प्रेरणा देते. त्यामुळे ‘प्रत्येक प्रसंगात आचरण कसे असायला हवे ?’, हे शिकता येते. नंतर तो साधकही अंतर्मुख होतो.
३. सौ. सुप्रियाताई घेत असलेल्या आढाव्यांमुळे साधकांना झालेले लाभ
३ अ. साधकांमध्ये चैतन्याची जागृती होणे : ‘सौ. सुप्रियाताई घेत असलेल्या आढाव्यातून प्रत्येकाला काही तरी अनमोल असे मिळाले’, असे वाटते. आढाव्यामुळे ‘मरगळ आणि निराशा निघून गेली’, असे प्रत्येकाला जाणवते. आढाव्यात मला जे आवश्यक तेच तत्त्व मिळत होते. त्यामुळे माझ्या मनाला समाधान अधिक प्रमाणात वाटत असे. ‘आढावा चुकू नये’, असे प्रत्येकाला वाटते. ‘आढाव्यामुळे साधकांमध्ये चैतन्याची जागृती होते’, असे मला वाटते.
३ आ. सर्व साधकांची कार्यप्रवणता वाढणे : आढावा असलेल्या दिवशी जणू काही झर्यातील पाणी जसे ओसंडून वहाते, तसा साधकांमधील उत्साह ओसंडत असल्याचे जाणवते. साधकांच्या मनाभोवती असलेले आवरण दूर होऊन त्यांचा उत्साह वाढून प्रयत्नांची कार्यप्रवणता वाढल्याचे लक्षात येते. ‘आढाव्यांमुळे सर्व साधकांच्या आनंदामध्ये वाढ झाली’, असे मला जाणवले.
४. सौ. सुप्रियाताई मधील अफाट क्षमतेची जाणीव होणे
सौ. सुप्रियाताई कितीही व्यस्त असली, तरी एकाच वेळी तिच्या अनेक सेवा चालू असतात. सौ. सुप्रियाताई एकीकडे आढावा घेत असतांना ती अन्य सेवांचा आढावाही मधे मधे घेत असते.
५. सौ. सुप्रिया माथुर यांच्या ठिकाणी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व अनुभवले.
‘हे गुरुमाऊली, या आढाव्याच्या माध्यमातून आपण आमच्यावर कृपा करत आहात. आपण आमचे प्रयत्न वृद्धींगत करून आम्हाला आपल्या चरणकमली घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !’
– कु. मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.५.२०२४)