निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्रात येणार !

निवडणूक आयोगाचे पथक २७ सप्टेंबरला राजकीय पक्ष, निवडणूक अधिकारी, निवडणुका राबवणार्‍या यंत्रणा, तसेच पोलीस अधिकारी यांची भेट घेतील, तर २८ सप्टेंबरला दुपारी ४.३० वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील शैक्षणिक संस्थेसह हिंजवडीत गांजा विक्री !

वाढती गांजा विक्री म्हणजे शिक्षण आणि संस्कृती यांचे माहेरघर असणार्‍या पुणे जिल्ह्याला लागलेले गालबोटच होय !

१.५८ कोटी रुपयांचे २.२८६ किलो सोने आणि हिरे जप्त !

अशा प्रकारे प्रतिदिन तस्करी करणार्‍यांना अटक केल्याची वृत्ते येतात; पण त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, हेही उघड व्हायला हवे, तरच अशा प्रकारांना आळा बसेल !

पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील मंदिरांतील देवतांच्या मूर्ती चोरणारी टोळी जेरबंद !

पुणे, तसेच सातारा जिल्ह्यांतील मंदिरातील देवतांच्या मूर्ती चोरणारी टोळी सुपे (ता. बारामती) येथील पोलिसांनी पाठलाग करून कह्यात घेतली आहे. या प्रकरणी आरोपी ओंकार साळुंखे, तुषार पवार, सौरभ पाटणे यांसह एका अल्पवयीन तरुणाला कह्यात घेतले आहे.

पुणे विमानतळाला मिळणार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव !

संकल्पनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला संमती मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महापे (नवी मुंबई) येथे बनावट नोटा छापणार्‍या दोघांना अटक

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! या दोघांसमवेत आणखी कुणाचा सहभाग आहे ? याचीही चौकशी पोलिसांनी करावी !

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील मोठ्या प्रकल्पांचे भूमीपूजन किंवा उद्घाटन !

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आरंभ करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. त्यानुसार पुणे वर्तुळाकार रस्ता, जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग, पॉडटॅक्सी, कांजूरमार्ग कारशेडसह इतर कारशेडचे भूमीपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे येथील हुजूरपागा शाळेत शिक्षकांनी साजरी केली ईद !

हिंदु विद्यार्थ्यांना इतर धर्मियांचे अनुयायी बनवण्याचा हा प्रयत्न आहे का ? संबंधित विभाग आणि शिक्षण अधिकारी यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

हिंदू समाज धर्म विसरल्याचाच हा परिपाक !

‘धर्मांधांना त्यांच्या धर्माकडून शक्ती मिळते; म्हणून ते धर्मासाठी आत्मसमर्पणही करतात. याच्या उलट हिंदू हे धर्म विसरल्यामुळे त्यांना काडी इतकीही किंमत (शक्ती) नाही.’

‘रेल्वे जिहाद’ रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

कानपूरच्या प्रेमपूर रेल्वे स्थानकाजवळ जे.टी.टी.एन्. गुड्स रेल्वेगाडी रुळावरून घसरवण्याचा कट रचण्यात आला. येथे रुळावर एक छोटा सिलिंडर ठेवलेला आढळून आला. लोको पायलटने (रेल्वे चालकाने) आपत्कालीन ब्रेक लावल्याने अपघात टळला.