पुणे शहरातील १० अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हा नोंद !

पुणे जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अनधिकृत शाळांच्या सूचीमध्ये पुणे शहरातील १४, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ आणि पिंपरी-चिंचवडमधील काही शाळांचा समावेश आहे.

देवगिरीच्या पायथ्याशी ‘स्वराज्य प्रेरणा स्तंभ’ उभारा ! – स्वराज्य तोरण प्रतिष्ठानची मागणी

स्वराज्य प्रेरणादिनानिमित्त देवगिरी गडाच्या पायथ्यापासून फेरी, तर माळीवाडा येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते.

पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार !

‘पुणे सार्वजनिक सभे’चे संस्थापक गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका यांच्या तिथीनुसार जयंतीच्या निमित्ताने देण्यात येणारा ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र वामनराव प्रभुदेसाई यांना देण्यात आला.

संपूर्ण जगाला तारणार्‍या हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक ! – प्रा. विनायक (श्याम) देशपांडे, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा

जेव्हा हिंदु धर्म संकटात येतो, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागतो. त्यामुळे जग टिकून रहायचे असेल, तर हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. विनायक (श्याम) देशपांडे यांनी वर्धा येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.

मंगळुरू (कर्नाटक) येथील कारागृहात बंदीवानांकडे सापडले २५ भ्रमणभाष संच !

या वस्तू कारागृहात बंदीवानांपर्यंत कशा पोचल्या ?, याची चौकशी केली जात आहे.

महाराष्‍ट्रात गणेशोत्‍सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’ !

यंदा गणेशोत्‍सवानिमित्त राज्‍यातील १ कोटी ७० लाख ८२ सहस्र ८६ शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्‍याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

भारत पुन्हा विश्वगुरु झाला पाहिजे ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

गुरूंनी सांगितलेले नाम, साधना, सेवा केली, तर आपली आणि समाजाची उन्नती होईल. अशा सात्त्विक समाजामुळे भारताला विश्वगुरु बनवणे शक्य होईल, असे मार्गदर्शन श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी केले.

औंध (पुणे) येथील २ कर्मचार्‍यांनी केली ट्रॅव्हल्स आस्थापनाची १ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक !

ट्रॅव्हल्स आस्थापनाकडे ग्राहकांच्या तक्रारी आल्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये गेल्या ४ वर्षांमध्ये या दोघांनी अपहार केल्याचे निदर्शनास आले.

दाते पंचांगातील भाकितानुसार २१ ते २५ जुलै या काळात अतीवृष्‍टी झाली !

ज्‍योतिषशास्‍त्राला थोतांड म्‍हणणारे आता काही बोलतील का ?