दाते पंचांगातील भाकितानुसार २१ ते २५ जुलै या काळात अतीवृष्‍टी झाली !

मुंबई – दाते पंचांगात यंदाच्‍या वर्षीचे वार्षिक भाकित प्रसिद्ध करण्‍यात आले आहे. त्‍यात दिलेल्‍या माहितीनुसार १९ जुलै या दिवशी सूर्याने पुष्‍य नक्षत्रात प्रवेश केला आहे. त्‍या वेळी मीन लग्‍न आणि वरुणमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन पर्जन्‍यसूचक बेडूक असून रवि, बुध, शुक्र आणि शनि हे जलनाडीत आहेत. या नक्षत्रात पाऊस चांगला पडेल. पूर किंवा अतीवृष्‍टी यांची शक्‍यता आहे. २१ ते २५, तसेच ३० आणि ३१ जुलै या दिवशी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. प्रत्‍यक्षातही पंचांगात दिल्‍याप्रमाणे २१ ते २५ जुलै या काळात पूरजन्‍य स्‍थिती येईपर्यंत राज्‍यात सर्वत्र पाऊस पडला. २५ जुलैनंतर पाऊस ओसरला. ‘आता ३० आणि ३१ जुलै या दिवशी कसा पाऊस पडतो ?’, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

संपादकीय भूमिका

  • ज्‍योतिषशास्‍त्राला थोतांड म्‍हणणारे आता काही बोलतील का ?