जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांची माहिती
पुणे – जिल्ह्यातील शाळांच्या पडताळणीतून ४९ शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले होते. शिक्षण विभागातून अनधिकृत शाळांपैकी १३ शाळा बंद करण्यात आल्या, १० शाळांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत आणि अन्य १३ शाळांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. (अनधिकृत शाळा चालू कशा रहातात ? त्यासाठी काय उपाययोजना काढणार, ते पाहिले पाहिजे. – संपादक) पुणे जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अनधिकृत शाळांच्या सूचीमध्ये पुणे शहरातील १४, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ आणि पिंपरी-चिंचवडमधील काही शाळांचा समावेश आहे.