स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप
नांदेड – माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपमध्ये असलेले अशोक चव्हाण यांच्या मालकीचा असलेला येळेगाव येथील ‘भाऊराव सहकारी साखर कारखाना’ ऊसतोड वाहतुकीच्या खर्चात तिपटीने वाढ करून शेतकर्यांच्या ७५ कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. याविषयी संघटनेने साखर संचालकांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नांदेडसह अर्धापूर, मुदखेड, भोकर तालुक्यातील शेतकरी ऊस कारखान्याला देत असतात. कारखान्याकडून प्रतिवर्षी ऊसतोड वाहतूक खर्चात ३० ते ४० रुपयांची वाढ केली जाते. पण या वर्षी थेट १०० ते १३० रुपयांची वाढ केली आहे. हा खर्च एफ आर्.पी.च्या रकमेतून वजा करून शिल्लक पैसे शेतकर्यांना दिले जातात.