कडूस (पुणे) येथील ‘दक्षणा फाऊंडेशन’च्या ५५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा !

४ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार चालू !

पुणे – जेईई आणि आयआयटी परीक्षेची पूर्वसिद्धता करणार्‍या कडूस (तालुका खेड) येथील ‘दक्षणा फाऊंडेशन’मधील ५५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. २९ विद्यार्थ्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेले असून यामधील ४ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे, तर २ विद्यार्थ्यांना वाय.सी.एम्. रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. १०० हून अधिक विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. आणखी काही विद्यार्थ्यांना उपचारांसाठी आणण्यात येत असून यामध्ये विद्यार्थिनींचाही सहभाग आहे.

राज्यातून जेईई आणि आयआयटी अशा पूर्वपरीक्षांच्या सिद्धता अभ्यासक्रमासाठी येथे ५५० विद्यार्थी निवासी आहेत. १९ एप्रिलला रात्री जेवण केल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.