जानेवारी ते मार्च २०२४ या काळात लाचखोरीच्या प्रमाणात घट !

लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये तात्काळ आणि कठोर शिक्षा दिल्यासच लाचखोरी पूर्णपणे नष्ट होऊ शकेल !

मुंबई – यंदा जानेवारी ते मार्च या ३ महिन्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत वर्ष २०२४ च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत सापळे १६ टक्क्यांनी घटले. लाचखोरांची संख्याही ३२१ वरून २६९ पर्यंत घसरली आहे.

लाचखोरीत नाशिक जिल्हा नेहमी प्रथम क्रमांकावर आहे, तर मुंबई सर्वांत खालच्या स्थानावर आहे. सर्व विभागांमध्ये महसूल विभाग पहिल्या क्रमांकावर आहे, तर पंचायत समिती शेवटच्या क्रमांकावर आहे.

संपादकीय भूमिका

केवळ घट होऊन चालणार नाही, तर लाचखोरी पूर्ण नष्ट होईपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रयत्न करायला हवेत !