पुणे येथील सनातनचे साधक तुषार भास्करवार यांना पी.एच्.डी. प्राप्त !

तुषार भास्करवार

पुणे, ३ एप्रिल (वार्ता.) – मूळचे चंद्रपूर येथील आणि सध्या पुणे येथे वास्तव्याला असलेले सनातनचे साधक तुषार भास्करवार यांना उपकरणीकरण अभियांत्रिकी (इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग) या विषयामध्ये पी.एच्.डी. प्राप्त झाली. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातून त्यांनी पी.एच्.डी. मिळवली.

याविषयी डॉ. तुषार भास्करवार यांनी सांगितले, ‘केवळ गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेमुळेच मला पी.एच्.डी. प्राप्त झाली आहे; कारण मला नेहमी वाटायचे, मी उगाच पी.एच्.डी.साठी प्रवेश घेतला आणि माझ्याकडून ते पूर्ण होणार नाही; पण गुरूंच्या कृपेमुळेच ते सहज करता आले. मी सप्टेंबर २०१७ मध्ये पी.एच्.डी.साठी नोंदणी केली आणि वर्ष २०२४ मध्ये ती पूर्ण झाली. सर्व काही गुरूंनीच केले आहे.’