
मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीची दुसरी सूची ३ एप्रिल या दिवशी घोषित केली आहे. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील, पालघर येथून भारती कामडी, तर जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी १७ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.
भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश !
भाजपचे जळगाव येथील विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी ३ एप्रिल या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. त्यांना जळगाव येथून उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती; मात्र जळगाव येथून ठाकरे गटाने करण पवार यांना उमेदवारी दिली आहे.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह