पुणे येथे अल्पवयीन मुलीशी विवाह करणार्‍या पोलिसाचा अटकपूर्व जामीन नाकारला !

पुणे – अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिला गर्भवती केलेल्या गणेश चिमटे या पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. बालविवाह केल्याविषयी एम्.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात गणेश चिमटेसह शिवाजी चिमटे, कुंता चिमटे आणि सारिका थोरात यांच्यावर विविध कलमानुसार २२ फेब्रुवारी या दिवशी गुन्हा नोंद केला आहे. समर्थ पोलीस ठाण्यात सेवारत असलेल्या गणेश चिमटे याला २ मासांपूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. (पोलीसदलाची प्रतिमा मलीन करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास केवळ निलंबित न करता अशांना कठोर शिक्षा करून बडतर्फ करावे ! – संपादक)

अत्याचार झालेली मुलगी १६ वर्षांची आहे. मुलगी अल्पवयीन आहे, याची माहिती असूनही शिवाजी आणि कुंता चिमटे यांनी तिचा आरोपी पोलीस गणेश याच्याशी विवाह लावून दिला. गणेश याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. त्यातून अपत्य जन्माला आले.

संपादकीय भूमिका

  • पोलिसांना नीतीमत्तेचे शिक्षण द्यायला हवे, हे लक्षात आणून देणारा प्रसंग !
  • पोलीसच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत असतील, तर महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ?
  • कायद्याचे भय नसणारे पोलीस जनतेला कायद्याचे पालन करायला कसे शिकवणार ?