सातारा, ३ एप्रिल (वार्ता.) – येथील शाहू कला मंदिर येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती दीपक डाफळे यांचा हिंदुत्वाच्या कार्यातील विशेष योगदानाबद्दल ‘भक्ती-शक्ती सन्माना’ने गौरव करण्यात आला. कोल्हापूर येथील कन्हेरी मठाच्या संचालिका सौ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या शुभहस्ते शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान करण्यात आला.
संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे लिखित ‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या आरंभी हिंदुत्वाच्या कार्यातील योगदान देणार्या हिंदुत्वनिष्ठांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ‘कार्तिक स्वामी देवस्थान देवगिरी अंभेरी’ येथील मठाधिपती परमपूज्य श्री परशुरामजी महाराज वाघ, जयराम स्वामी वडगाव येथील मठाधिपती श्री विठ्ठल स्वामी महाराज, हिंदु एकता आंदोलनचे श्री. अजय पावसकर, शिवव्याख्याते श्री. सचिन ढोबळे आणि सौरभ करडे आदी उपस्थित होते.