मुंबई महापालिकेच्या झोपडपट्ट्यांतील कचरामुक्ती प्रकल्पाच्या निविदेला प्रतिसाद नाही !

मुंबई – मुंबईतील झोपडपट्टी आणि परिसर कचरामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने योजना आखली आहे. यामध्ये झोपडपट्ट्यांमधून घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याकडे, तसेच गल्लीबोळांमध्ये सफाई करतांना सार्वजनिक शौचालयांच्या सफाईकडेही लक्ष देण्यात येणार आहे. या कामासाठी खासगी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी मुंबई पालिकेने निविदा काढली; मात्र त्याला एकाही निविदाकाराने प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे निविदेला २६ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबईत यापूर्वी ‘स्वच्छता मुंबई प्रबोधन अभियान’ नावाची योजनाही पूर्णपणे अपयशी ठरली. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि देखभाल अन् मलनि:सारण वाहिन्यांची नीट देखभाल करणे अशा ३ गोष्टी त्यांत होत्या.