राज्य पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालकपदी जया वहाणे यांची नियुक्ती !

छत्रपती संभाजीनगर – येथील राज्य पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक अमोल गोटे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांचे नांदेड विभागाच्या साहाय्यक संचालकपदी स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागी जया वहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जया वहाणे यांनी १८ मार्चला त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्या यापूर्वी नागपूर विभागाच्या साहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होत्या.