सौ. सुरेखा (माई) सुरेश पुराणिक यांचा दशक्रिया विधी !

हडपसर (जिल्हा पुणे) २९ फेब्रुवारी (वार्ता) – ‘जय शंकर प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश उपाख्य पप्पाजी पुराणिक यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुरेखा (माई) सुरेश पुराणिक वय (७१ वर्षे) यांना २१ फेब्रुवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता देवाज्ञा झाली. हृदयविकाराच्या धक्क्याने हडपसर येथे राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, १ मुलगा, सून, १ मुलगी, जावई, ३ नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी अमरधाम स्मशान भूमी, हडपसर, माळवाडी येथे करण्यात आला. पप्पाजी पुराणिक यांचा हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात वेळोवेळी उत्स्फूर्त सहभाग असतो. समितीसह सनातन संस्थेच्या कार्याला त्यांच्या सदिच्छा होत्या. हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी २५ फेब्रुवारी या दिवशी पप्पाजी पुराणिक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. सौ. पुराणिक यांचा दशक्रिया विधी १ मार्च या दिवशी अमरधाम शिवमंदिर स्मशानभूमी, हडपसर येथे होणार आहे.

इच्छा, ईर्ष्या, वासना, अतृप्ती आदी विकारांपासून अलिप्त असलेल्या माई म्हणजेच सौ. सुरेखा (माई) सुरेश पुराणिक यांना हिंदु जनजागृती समितीने श्रद्धांजली वाहिली आहे.