मुंबई पोलीस नालायक ! – निखिल वागळे
‘मुंबई पोलीस नालायक आहेत. तक्रारीची पोचही ४८ घंट्यांत नाही. माहीम पोलीस ठाणे तर भंगारात विकले पाहिजे. आमेन (निश्चित)’, असे अपशब्द वापरून पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांनी त्यांचा राग ‘एक्स’वर व्यक्त केला.
‘मुंबई पोलीस नालायक आहेत. तक्रारीची पोचही ४८ घंट्यांत नाही. माहीम पोलीस ठाणे तर भंगारात विकले पाहिजे. आमेन (निश्चित)’, असे अपशब्द वापरून पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांनी त्यांचा राग ‘एक्स’वर व्यक्त केला.
प्रभु श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श बंधू, तसेच आदर्श शत्रू होते. त्यांचे गुण स्वतःमध्ये आणून अंतःकरणात रामराज्य निर्माण करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी केले.
बसगाड्या जाळल्या, घरेदारे जाळली, पोलिसांना मारले आदी गुन्हे न्यायालयीन आदेशाखेरीज मागे घेता येत नाहीत. अन्य गुन्हे मागे घेतले जातील.
छगन भुजबळ यांनी २८ जानेवारीचे सर्व कार्यक्रम रहित केले असून त्या दिवशी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथील शासकीय निवासस्थानी सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २७ जानेवारी या दिवशी ‘एक्स’वर पोस्ट करत मराठा आरक्षणासाठी लढा देणार्या मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करून आपले मत व्यक्त केले आहे.
डॉ. पप्पूकुमार बोदेसम गौतम या व्यक्तीने प्रभु श्रीराम यांच्या संदर्भातील धार्मिक श्रद्धा दुखावण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करून हिंदु धर्मियांच्या श्रद्धास्थानाचा अपमान केला होता.
राज्यात गेल्यावर्षी सप्टेंबरपासून चालू झालेले आणि मार्चपर्यंत असणार्या ‘निरोगी तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानाद्वारे १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे.
‘हिंदूंनो, अनेक पिढ्यांच्या संघर्षानंतर श्रीरामाच्या कृपेमुळे आपल्या पिढीला श्रीराम त्याच्या जन्मभूमीत विराजमान झालेला बघायला मिळत आहे. इतक्यावर आनंद मानणे योग्य रहाणार नाही. ‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. यासाठी आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न होणे आवश्यक आहेत – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले