Shri Ramlala Arun Yogiraj : मूर्तीकार अरुण योगिराज ६ महिने ऋषीसारखे जीवन जगले !

श्री रामललाची मूर्ती बनवणारे योगीराज यांच्या पत्नीने दिली माहिती

ठाणे येथील इंग्रजी शाळेचे शुल्क न भरल्याने परीक्षा चालू असतांना विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले !

पालकांनी आरोप केल्यानंतर शाळेच्या आवारात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांकडून शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी झाली. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी शाळेत धाव घेत राजकीय पदाधिकार्‍यांना रोखले.

बदलापूर येथील रसायनाच्या आस्थापनात भीषण स्फोट !

हे स्फोट इतके भयंकर होते की, ५ किलोमीटर अंतरावर त्याचे हादरे बसले. अग्नीशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. घायाळ कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

कोथरूड (पुणे) पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस फौजदार निलंबित !

लाचखोर पोलीस प्रशासन !

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड !

या संदर्भात राजन साळवी यांनी म्हटले आहे की, अधिकार्‍यांना संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. मला अटक झाली तरी चालेल. अटक, कारागृह हे काही मला नवीन नाही. मी काय आहे, ते माझे कुटुंब, जनता यांना ठाऊक आहे.

ठाणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांद्वारे ‘श्रीराम’ नामाचा जयघोष

रामकथा, पालखी मिरवणुका, रामायण महोत्सव, तसेच तलावाच्या परिसरात महाआरती, व्याख्यान, श्रीरामाच्या जीवनप्रवासावर आधारित ‘लेझर शो’ आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

मुंबई आणि ठाणे येथील बाजारपेठा झाल्या भगवेमय !

लालबाग मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वज, टोप्या, रस्त्यांवर लावण्यात येणारे पट्टे यांची दुकाने आहेत. येथेही नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

‘मुंबई फेस्टिव्हल’चे प्रतिवर्षी आयोजन होणार !

‘राज्याची विविधता आणि संस्कृती यांची माहिती पर्यटकांना होण्यासाठी हा महोत्सव मोलाची भूमिका बजावेल’, असे ‘मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समिती’चे अध्यक्ष आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

पुणे येथे रुग्णवाहिकेतून गांजाची विक्री करणार्‍या टोळीस अटक !

एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्री होत असेल, तर किती तरुण व्यसनाच्या आहारी जात असतील याचा विचारही करू शकत नाही.

बुद्धीप्रामाण्यवादी आणि कुंडलिनी शक्ती !

‘साधना केल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होते. हे आतापर्यंतच्या युगांत लाखो साधकांनी अनुभवले आहे; पण साधनेवर विश्‍वास नसणारे बुद्धीप्रामाण्यवादी साधना न करता म्हणतील, ‘कुंडलिनी दाखवा, नाहीतर ती नाहीच !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले