अधिवक्त्यास लाच घेण्यास प्रवृत्त केल्याचे प्रकरण
पुणे – अधिवक्ता सुमित गायकवाड यास ५ लाख रुपयांची लाच घेण्यास प्रवृत्त करणार्या कोथरूड पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस फौजदार गोपाळ पवार याला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. (केवळ निलंबन न करता कायमस्वरूपी बडतर्फच करणे आवश्यक ! – संपादक) निलंबनाचा आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ चे साहाय्यक उपायुक्त संभाजी कदम यांनी १६ जानेवारी या दिवशी दिला. पोलिसांना सांगून गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि साहाय्य करण्यासाठी पोलिसांना ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून महिलेकडून काही रक्कम लाच म्हणून स्वीकारतांना अधिवक्ता गायकवाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० जानेवारी या दिवशी पकडले होते. याविषयी २५ वर्षीय महिलेने तक्रार प्रविष्ट केली होती. अधिवक्ता गायकवाड याला गोपाळ पवार यांनी लाच घेण्यास प्रवृत्त केल्याचे समोर येताच ही कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिका :लाचखोर पोलीस प्रशासन ! |