मुंबई – महाराष्ट्राची कला, संस्कृती, क्रीडा यांसह मुंबईचा समृद्ध वारसा या सर्वांची माहिती देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर होण्यासाठी ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ या महोत्सवाचे देशात प्रथमच मोठ्या स्वरूपात ५० विविध ठिकाणी ५० विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षी अशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, असे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘राज्याची विविधता आणि संस्कृती यांची माहिती पर्यटकांना होण्यासाठी हा महोत्सव मोलाची भूमिका बजावेल’, असे ‘मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समिती’चे अध्यक्ष आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.