वैमानिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्याचे आमीष दाखवून फसवणूक !

मुंबई – मुलाला वैमानिकाचे प्रशिक्षण देण्याचे आमीष दाखवून एका मुलीने वडिलांची २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना चेंबूर येथे घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ओळखीच्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्याचे आश्वासन तक्रारदारांच्या मित्राच्या मुलीने त्यांना दिले. त्यामुळे टप्प्याटप्याने तिला २६ लाख रुपये दिले. अनेक मास उलटल्यानंतरही मुलाला प्रशिक्षण केंद्रात प्रवेश न मिळाल्याने त्यांनी मित्राची मुलगी शरदी पै हिच्याकडे विचारपूस केली; मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले.