वादग्रस्त जागेत कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही धर्माची स्मशानभूमी किंवा दफनभूमी नको ! – सुनील सामंत
कळंबा परिसरात स्मशानभूमी होऊ नये, यासाठी गेल्या १६ वर्षांपासून तेथील नागरिक आंदोलन करत आहेत.
कळंबा परिसरात स्मशानभूमी होऊ नये, यासाठी गेल्या १६ वर्षांपासून तेथील नागरिक आंदोलन करत आहेत.
विनापरवाना शस्त्र घेऊन फिरणार्या दोन सराईत आरोपींना पंतनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून देशी बनावटीची बंदूक आणि ३ जिवंत काडतुसे हस्तगत केली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन त्यांना २४ ते २८ जानेवारी या कालावधीत होत असलेल्या गडकोट मोहिमेच्या समारोपप्रसंगी उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले.
येथील ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ नंदीध्वजांचा अनुपम अक्षता सोहळा १४ जानेवारी या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला.
स्वर-राग अर्थात् शास्त्रीय संगीताची गोडी त्यांच्यात निर्माण होण्यासाठी आणि संगीताच्या मार्गावरून योग्य दिशेने चालण्याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. असे झाल्यास प्रभाताई यांची शास्त्रीय गायनाची परंपरा निश्चितच पुढच्या पिढीत चालू राहील, हे निश्चित !
कोरेगाव तालुक्यात एकंबे गावात ऊसतोडणीसाठी जव्हार येथील मजूर म्हणून गेलेल्या कातकरी लोकांना प्रतिदिन खोलीत डांबून मारहाण करण्यात येत होती.
चाकण औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. वर्ष २०२२ मध्ये शहरातून ३९ लाख रुपये किंमतीच्या १५७ दुचाकी, तर वर्ष २०२३ मध्ये २५ लाख रुपये किंमतीच्या १०९ दुचाकींची चोरी झाली आहे.
‘वर्क व्हिसा’च्या ऐवजी ‘प्रवासी व्हिसा’वर ओमानमार्गे कुवेतमध्ये जाणाच्या प्रयत्नात असलेल्या ३ महिलांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लोकलगाडीने प्रवास करत बदलापूर येथील प्रवाशांच्या अडचणी समजून घेतल्या.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय म्हणाल्या, ‘‘राम बहुदा दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. त्यामुळे भाजप त्याला घर बांधून देत आहे.’’