चाकण (पुणे) – चाकण औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. वर्ष २०२२ मध्ये शहरातून ३९ लाख रुपये किंमतीच्या १५७ दुचाकी, तर वर्ष २०२३ मध्ये २५ लाख रुपये किंमतीच्या १०९ दुचाकींची चोरी झाली आहे. दुचाकी चोरी होण्याच्या ठिकाणांचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. सर्वाधिक चोर्या होणारी ठिकाणे निश्चित झाली असून त्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे दुचाकींच्या चोर्या रोखल्या जात आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले. (एकाही दुचाकीची चोरी व्हायला नको, असा पोलिसांचा वचक असायला हवा. तसेच संबंधित चोरांना तात्काळ कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक)
शहरांमध्ये गाड्यांसाठी स्वतंत्र वाहनतळ यंत्रणा नाही. त्यामुळे दुचाकी गाडी जागा मिळेल त्या ठिकाणी लावली जाते. शहरांमध्ये नगर परिषदेने सी.सी.टी.व्ही. लावले नसल्याने चोरी करणे सहज शक्य होते. चोर्यांमध्ये ‘स्प्लेंडर’ या गाड्यांना लक्ष केले जात आहे. चाकण बसस्थानक, माणिक चौक, तळेगाव चौक, आंबेठाण चौक येथून चोर्या होण्याचे प्रमाण अधिक आहे.