मुंबई विमानतळावर ३ महिलांना अटक

मुंबई – ‘वर्क व्हिसा’च्या ऐवजी ‘प्रवासी व्हिसा’वर ओमानमार्गे कुवेतमध्ये जाणाच्या प्रयत्नात असलेल्या ३ महिलांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले. पारपत्र विभाग आणि ‘इमिग्रेशन ३ विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी महिलांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. चौकशी केली असता कुवेतमध्ये ‘वर्क व्हिसा’च्या जुन्या नोंदी आढळल्या. तसेच नुकताच त्यांचा वर्क व्हिसा रहित केला होता.

विमला अक्काबटुला, नलिनी पैला आणि मार्था कंडेली या तीन महिला १२ जानेवारीला रात्री ओमानची राजधानी मस्कतला जात होत्या. संशयामुळे त्यांची पडताळणी केली.