मुंबई – विनापरवाना शस्त्र घेऊन फिरणार्या दोन सराईत आरोपींना पंतनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून देशी बनावटीची बंदूक आणि ३ जिवंत काडतुसे हस्तगत केली. मुनिष खान (वय ३४ वर्षे) आणि मुकद्दर पठाण (वय २४ वर्षे) अशी या आरोपींची नावे असून मुनिष धारावीत, तर मुकद्दर उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे. या आरोपींकडे शस्त्रसाठा असून ते पंतनगर परिसरातील पेट्रोल पंपावर येणार असल्याची माहिती पंतनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना कह्यात घेतले. या वेळी पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ देशी बनावटीची बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे सापडली. अनधिकृतपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकागुन्हेगारीत बहुसंख्य असणारे धर्मांध ! |