म्हैस आणि रेडे यांच्या चरबीपासून सिद्ध केलेले बनावट तूप जप्त !

भिवंडी येथे बंद केलेल्या पशूवधगृहातील प्रकार उघड !

प्रतीकात्मक छायाचित्र

भिवंडी – येथील बंद केलेल्या पशूवधगृहात बनावट तूप सिद्ध केले जात असल्याचे समजल्यावर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी येथे धाड घातली. तेव्हा हे बनावट तूप म्हैस आणि रेडे यांच्या चरबीपासून सिद्ध केल्याचे उघड झाले. हा कारखानाही उद्ध्वस्त करण्यात आला, तसेच १० ते १५ कढयांमधील तूप ओतून देण्यात आले. हे तूप विविध उपाहारगृहे आणि खानावळी यांना पुरवले जात होते. यातील संबंधितांवर कारवाई होण्यासाठी तक्रार करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

या प्रसंगातून बंद पशूवधृगहांमध्ये काय चालते, हे लक्षात आल्यावर अन्यत्रच्या बंद पशूवधगृहांचीही पडताळणी होणे आवश्यक आहे !