साधकांनी प्रतिदिन साधनेच्या प्रयत्नांच्या समवेत अनिष्ट शक्तीचे त्रासदायक आवरण काढणे, नामजपादी उपाय करणे आणि त्याचा आढावा देणे आवश्यक !

साधकांनी ‘मला त्रास नाही किंवा काही होणार नाही’, असे गृहीत न धरता नामजपादी उपायांना महत्त्व देणे’, ही काळाची आवश्यकता आहे.’

मोक्षप्राप्ती एकट्याने आणि एकट्यालाच होते !

आरंभिक साधनेनंतर पुढे प्रगतीसाठी व्यक्तिगत प्रयत्न अत्यावश्यक असतात. मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न अगदी एकट्यानेच करावे लागतात आणि मोक्षप्राप्ती केवळ त्या एकट्यालाच होते.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आरती करतांना पू. सदाशिव परब (पू. भाऊकाका) यांच्या लाभलेल्या चैतन्यमय सत्संगाने साधकाला झालेले लाभ !

‘संतांच्या सत्संगाचा लाभ कसा होतो !’, हे परात्पर गुरुदेवांनी मला प्रत्यक्ष अनुभूती देऊन शिकवले.

पुणे शहरात एकाच वेळी ९ ठिकाणी धाड टाकून १० लाखांची ‘ई-सिगारेट’ जप्त !

शहरातील शाळा, महाविद्यालये यांच्या परिसरामध्ये छुप्या पद्धतीने प्रतिबंधित ‘ई-सिगारेट’ची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या.

लोकांनी देव, राष्ट्र आणि धर्म यांसाठी तन, मन अन् धन अर्पण करावे ! – आचार्य प.पू. जितेंद्रनाथ महाराज, श्रीनाथ पिठाधिश्वर, श्री देवनाथ पीठ, श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जी

‘राष्ट्र आम्हाला सर्वकाही देते, आम्हीही राष्ट्राला काही देणे शिकले पाहिजे. देव आपल्याला सर्वकाही देतो, आपणही त्यांना काही देण्यास शिकले पाहिजे’, या उक्तीनुसार सर्वांनीच देव, राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रती आपले कर्तव्य समजून राष्ट्रकार्यासाठी तन, मन आणि धन अर्पण करायला हवे….

नाशिक येथे हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ !

येथील सिडको परिसरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्षुल्लक कारणावरून हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी कुणीही तक्रार न दिल्याने याविषयी कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

वराड-सोनवडेपार पुलाचे काम चालू होण्यासाठी ग्रामस्थांची उपोषणाची चेतावणी

४ वर्षांपूर्वी भूमीपूजन झालेल्या तालुक्यातील वराड-सोनवडेपार या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या पुलाचे काम त्वरित चालू न केल्यास २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी येथील नदीत उतरून उपोषण करू, अशी चेतावणी वराड आणि सोनवडे येथील ग्रामस्थांनी दिली आहे.

शिवसेनेच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेविषयीची सुनावणी १४ फेब्रुवारीला !

शिवसेनेतून बाहेर पडून भाजपला पाठिंबा देणार्‍या आमदारांतील १६ जणांना अपात्र ठरवावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी १४ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.

‘शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणांनी केला’ या पुस्तकावर बंदीची मागणी !

पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणारे असल्याचा ‘परशुराम सेवा संघा’चा आरोप