‘शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणांनी केला’ या पुस्तकावर बंदीची मागणी !

पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणारे असल्याचा ‘परशुराम सेवा संघा’चा आरोप

पुणे – विलास खरात यांनी लिहिलेल्या ‘शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणांनी केला’, या पुस्तकाचे प्रकाशन १२ जानेवारी या दिवशी होणार आहे. हे पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणारे आहे, असा आरोप ‘परशुराम सेवा संघा’चे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केला आहे आणि या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली  आहे. याविरुद्ध त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

देशपांडे यांनी सांगितले की, खोटा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून छापला जाणे चुकीचे आहे. पेशवे ब्राह्मण असल्याने हे केले जात आहे. पेशवे हे कधीही राजे झाले नाहीत. राजे हे भोसले घराणे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराणे आमचे दैवत आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घातली गेली पाहिजे.