वराड-सोनवडेपार पुलाचे काम चालू होण्यासाठी ग्रामस्थांची उपोषणाची चेतावणी

पुलाचे काम ४ वर्षांपासून रखडलेलेच !

वराड आणि सोनवडे येथील ग्रामस्थ

मालवण – ४ वर्षांपूर्वी भूमीपूजन झालेल्या तालुक्यातील वराड-सोनवडेपार या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या पुलाचे काम त्वरित चालू न केल्यास २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी येथील नदीत उतरून उपोषण करू, अशी चेतावणी वराड आणि सोनवडे येथील ग्रामस्थांनी दिली आहे.

कर्ली नदीवर मालवण आणि कुडाळ या तालुक्यांना जोडणार्‍या या पुलाचे भूमीपूजन वर्ष २०१८ मध्ये झाले होते. तेव्हा हा पूल १८ मासांत पूर्ण करण्याचा कालावधी ठरवून देण्यात आला होता; परंतु अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही. पुलाचे केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या पुलाविषयी ग्रामस्थांनी नुकतीच बैठक घेतली, तसेच पुलाच्या कामाची पहाणी केली. पहाणीच्या वेळी पुलाचे काम बंद असून कामासाठी आवश्यक साहित्यही तेथे नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाची चेतावणी दिली आहे.

संपादकीय भूमिका

पुलाचे काम ४ वर्षे प्रलंबित रहाणे प्रशासनाला लज्जास्पद !