सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
देव (टीप) माझा साधा आणि भोळा ।
आहे कृपाळू अन् कनवाळू ।
आहे तो साधकांची माऊली ।
कृपेने तिच्या दुःख दूर होई ।। १ ।।
देव माझा साधा आणि भोळा ।
आहे कृपाळू अन् कनवाळू ।
शिकवून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन ।
आध्यात्मिक उन्नती तो करून घेई ।। २ ।।
देव माझा साधा आणि भोळा ।
आहे कृपाळू अन् कनवाळू ।
साधकांच्या पितरांना गती देई ।
आणि साधकांना मोक्षास तो नेई ।। ३ ।।
देव माझा साधा आणि भोळा ।
आहे कृपाळू अन् कनवाळू ।
सर्वत्र साधक घडवी ।
कोटी ब्रह्मांडाचा तो धनी ।। ४ ।।
देव माझा साधा आणि भोळा ।
आहे कृपाळू अन् कनवाळू ।
साधकांना संतपदी तो नेई ।
चैतन्याने त्याच्या विश्व उजळी ।। ५ ।।
देव माझा साधा आणि भोळा ।
आहे कृपाळू अन् कनवाळू ।
उचले तो गोवर्धन हिंदु राष्ट्राचा ।
साधकहो गोवर्धनास लावू काठ्या ।। ६ ।।
देव माझा साधा आणि भोळा ।
आहे कृपाळू अन् कनवाळू ।
करीतसे तो साधकांचे रक्षण ।
कृतज्ञताभावे आळवू त्याला ।। ७ ।।
टीप : परात्पर गुरु डॉ. आठवले.
– श्रीमती अनुराधा भुजले (२१.११.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |