।। श्रीकृष्णाय नम: ।।
सामुहिक नामजप, देवतांचे सण-उत्सव साजरे करणे, कुटुंब आणि इष्टमित्रांसह तीर्थयात्रा इत्यादी धार्मिक कार्ये देवतांना प्रसन्न करण्यासाठी केली जातात. ही केल्याने चांगले संस्कार, सात्विक वृत्ती, ईश्वराविषयी आवड सर्वांच्या मनामध्ये रुजण्यात सहाय्य होते. ही आरंभिक साधना असते.
पुढे प्रगतीसाठी व्यक्तिगत प्रयत्न अत्यावश्यक असतात. मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न अगदी एकट्यानेच करावे लागतात आणि मोक्षप्राप्ती केवळ त्या एकट्यालाच होते.
– अनंत आठवले. १९.०९.२०२२