‘स्वामी विवेकानंद ट्रस्ट’च्या माध्यमातून देण्यात आलेल्या राख्या सैनिकांचे मानसिक बळ वाढवतील ! – बंडू कात्रे, सुभेदार मेजर
केवळ युद्धाच्या वेळी नव्हे, तर अहोरात्र देश संरक्षणासाठी कार्यरत असणार्या सैनिकांचे स्मरण ठेवून माता-भगिनींनी ‘स्वामी विवेकानंद ट्रस्ट’च्या माध्यमातून पाठवलेल्या राख्यांमुळे सैनिकांचे मनोधैर्य नक्कीच वाढणार आहे, असे मनोगत सुभेदार मेजर बंडू कात्रे यांनी व्यक्त केले.
भारताच्या ‘चंद्रयान-३’ मोहिमेत ‘कूपर समुहा’च्या क्रँकशाफ्टचा उपयोग ! – खासदार उदयनराजे भोसले, भाजप
भारताच्या ‘चंद्रयान-३’ मोहिमेत ‘कूपर उद्योग समुहा’च्या क्रँकशाफ्टचा (क्राँप्रेसर यंत्रात वापरले जाणारे उपकरण) उपयोग करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा कूपर समुहाचे देशाच्या वाटचालीतील योगदान अधोरेखित झाले आहे.
‘शककर्ते शिवराय’ हा ग्रंथ लिहिण्यासाठी सद़्गुरूंचा आशीर्वाद आणि श्री गणेशाची कृपा लाभली ! – सद़्गुरुदास विजयराव देशमुख
शिवकथाकार श्री. विजयराव देशमुख लिखित ‘शककर्ते शिवराय’ ग्रंथाची ५ वी आवृत्ती, ‘राजा शंभू छत्रपती’ ग्रंथाची ५ वी आवृत्ती आणि ‘सूर्यपुत्र’ या ग्रंथाची ३ री आवृत्ती या ग्रंथांचे प्रकाशन कोथरूड येथे झाले.
धनक्रांती !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ च्या ऑगस्ट मासामध्ये ‘पंतप्रधान जनधन योजना’ चालू केली. जे अत्यंत गरीब किंवा दारिद्य्ररेषेखालील आहेत, असे सर्व कामगार, ग्रामीण भागांतील नागरिक आदींसाठी अधिकोषामध्ये खाते काढण्याची ही योजना होती.
रुग्णालयात आवश्यक सुविधांची वानवा; खराब शवपेट्यांमुळे मृतदेह उघड्यावर !
भाईंदर येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात अनागोंदी कारभार चालू आहे. अपक्ष आमदार गीता जैन यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी २८ ऑगस्टला ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांना बोलावले होते.
ठाणे जिल्ह्यात ‘लंपी’ चर्मरोगाचा संसर्ग नाही ! – पशूसंवर्धन विभाग, ठाणे
ठाणे जिल्ह्यात सध्या ‘लंपी’ या चर्मरोगाचा संसर्ग झालेला नाही, असे ठाणे पशूसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. ‘लंपी’ चर्मरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात पशूसंवर्धन विभागासह अन्य यंत्रणा सिद्ध करण्यात आली आहे.
वाशी आणि तुर्भे येथे मोठ्या प्रमाणात लावलेले विज्ञापनांचे फलक अनधिकृत !
अशी मागणी का करावी लागते ? आयुक्त स्वतः कारवाई का करत नाहीत ?
कल्याण येथे मध्य रेल्वेच्या सिग्नलमधील बिघाडामुळे वाहतूक खोळंबली !
कल्याण येथे मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत २९ ऑगस्टला सकाळी बिघाड झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
‘संस्कृत’ एक अद़्भुत रचना होऊ शकणारी भाषा !
ज्या संस्कृतला इंग्रजांनी हेटाळले होते, त्याच संस्कृतमध्ये आजच्या काळातही लीलया रचना होत आहेत आणि त्याही कालानुरूप !’