ठाणे जिल्‍ह्यात ‘लंपी’ चर्मरोगाचा संसर्ग नाही ! – पशूसंवर्धन विभाग, ठाणे

ठाणे, २९ ऑगस्‍ट (वार्ता.) – ठाणे जिल्‍ह्यात सध्‍या ‘लंपी’ या चर्मरोगाचा संसर्ग झालेला नाही, असे ठाणे पशूसंवर्धन विभागाने स्‍पष्‍ट केले आहे. ‘लंपी’ चर्मरोग नियंत्रणासाठी जिल्‍ह्यात पशूसंवर्धन विभागासह अन्‍य यंत्रणा सिद्ध करण्‍यात आली आहे. सर्व ग्रामपंचायतींना कीटकनाशके फवारणी करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. ‘गोवंशियांच्‍या लसीकरणासाठी जवळच्‍या शासकीय पशूवैद्यकीय चिकित्‍सालयाशी संपर्क साधावा. अन्‍य जिल्‍ह्यांतून जनावरे खरेदी करतांना लसीकरण प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. पशूधन पालक शेतकर्‍यांनी घाबरून न जाता त्‍यांच्‍या पशूधनाची काळजी घ्‍यावी’, असे आवाहन जिल्‍हा पशूसंवर्धन उपायुक्‍त डॉ. व.दि. जोशी आणि डॉ. समीर तोडणकर यांनी केले आहे.