धर्मांतरविरोधी आणि गोहत्याबंदी कायदे रहित केल्यास रस्त्यावर उतरू !

साधू-संतांची कर्नाटकातील काँग्रेस सरकारला चेतावणी !

मंगळुरू (कर्नाटक) – येथे साधू-संतांनी एक बैठक घेऊन राज्यातील काँग्रेस सरकारला चेतावणी दिली आहे. जर सरकारने धर्मांतरविरोधी कायदा आणि गोहत्याबंदी कायदा रहित केला, तर तीव्र विरोध केला जाईल. त्यासाठी आम्ही रस्त्यावरही उतरू. उपोषण करू, अशी चेतावणी दिली आहे.

१. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.

२. या संदर्भात लवकरच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही जर सरकार हट्ट करत कायदे रहित करील, तर आंदोलन करण्याची रणनीती सिद्ध ठेवण्यात येणार आहे, असेही साधू-संतांकडून सांगण्यात आले.

संपादकीय भूमिका

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष नव्हे, तर साधू-संतांना अशी चेतावणी द्यावी लागते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !