गुन्ह्यात आरोपींची संख्या २१ वर !
मालेगाव – येथे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात इस्लामचा धर्मप्रचार केल्याच्या प्रकरणात पुणे येथील प्रा. अनिस कुट्टी यांच्यासह इतर दोघांनाही आरोपी करण्यात आले आहे. या गुन्ह्यात आरोपींची संख्या २१ झाली आहे. मसगा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उपप्राचाय यांसह ६ जणांचा अटकपूर्व जामीन संमत झाला आहे.
मसगा येथे मौलानांनी ११ जून या दिवशी ‘मशीद मिलन गुड करीयर’ या नावाने ‘सत्य मलिक लोकसेवा ग्रुप’च्या वतीने एन्.सी.सी.च्या हिंदु विद्यार्थ्यांना बळजोरीने समवेत घेऊन एक दिवसीय कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात ४० इस्लामिक धर्मगरु आणि मौलवी यांनी ‘एन्.डी.सी.सी.’चे प्रशिक्षण देऊ’, असे खोटे सांगून कुराणातील आयाताची माहिती देऊन हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ‘हा कार्यक्रम धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ या हेतूने हिंदु तरुणांना लक्ष्य करून एकप्रकारचे हे सुनियोजित षड्यंत्र आहे. या कार्यक्रमात इस्लामिक उपासनापद्धत शिकवून १ दिवसीय धर्मांतर केले आहे’, असा आरोप करत या अपप्रकाराची चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी करून या कार्यक्रमाला विरोध केला होता.
अनुमती न घेता हा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी मसगा महाविद्यालयाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांना निलंबित केले होते. या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी १५ जणांवर जातीय तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद केला आहे.