मानसिक आजार लहानपणापासून स्मार्टफोन वापरल्यास बळावतात !
वॉशिंग्टन (अमेरिका) येथील ‘सेपियन लॅब्ज’ या संस्थेने एक महत्त्वपूर्ण संशोधन केले. जर लहान वयात मुलांच्या हातात ‘स्मार्टफोन’ दिला, तर मोठे झाल्यानंतर त्यांना गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार जडू शकतात. त्यातही पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर याचा अधिक परिणाम होतो, असे या संशोधनातून समोर आले आहे.