वॉशिंग्टन (अमेरिका) येथील ‘सेपियन लॅब्ज’ या संस्थेने एक महत्त्वपूर्ण संशोधन केले. जर लहान वयात मुलांच्या हातात ‘स्मार्टफोन’ दिला, तर मोठे झाल्यानंतर त्यांना गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार जडू शकतात.
त्यातही पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर याचा अधिक परिणाम होतो, असे या संशोधनातून समोर आले आहे.
१. संशोधनानुसार जेवढ्या उशिरा मुलांच्या हातात स्मार्टफोन पडला, तेवढा त्यांच्यातील आत्मविश्वास आणि इतरांशी सकारात्मकतेने संबंध ठेवण्याची त्यांची क्षमता वाढल्याचे दिसून आले. तसेच ज्या मुलींना उशिरा स्मार्टफोन मिळाला, त्यांच्या दृष्टीकोनातील अनुकूलता आणि लवचिकता अधिक असल्याचे लक्षात आले.
२. जर मुलांना अतिशय लहान वयात स्मार्टफोन हाताळण्यास मिळाला, तर त्यांच्यात आत्महत्येचे विचार, इतरांच्या प्रती आक्रमकतेची भावना, वास्तवापासून दूर रहाणे, अशा अनेक मानसिक आरोग्याशी निगडित समस्या दिसून आल्या.
तंत्रज्ञानाचा अतिरेक लहान मुले आणि युवक यांच्या मानसिक आरोग्यावर किती परिणाम करते ? हे या संशोधनातून दिसून येते.