
कोल्हापूर – येथील सनातनचा साधक कु. राज पवार याला इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण मिळाले, तर कु. श्रावणी करी हिलाही ८७ टक्के गुण मिळाले. या संदर्भात कु. राज म्हणाला, ‘‘शाळेत शिक्षक शिकवत असतांना साक्षात् गुरुदेव आणि श्री सरस्वतीदेवी शिकवत आहे’, असा भाव ठेवला. याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला. प्रासंगिक सेवांमध्ये सहभागी होतो. त्यात फलक लिखाण, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा केली.’’ आपल्या यशाविषयी कु. श्रावणी करी म्हणाली, ‘‘मी प्रतिदिन प्रार्थनेसमवेत ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करत असे. त्याचा लाभ झाला. प्रासंगिक सेवांसमवेत मी सात्त्विक उत्पादनांचे वितरणही करते. श्री गुरुकृपेमुळेच मला हे यश मिळू शकले.’’
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !