कोल्हापूर येथील अपप्रकार
कोल्हापूर – शहरातील राजारामपुरी परिसरातील ‘श्री’ रुग्णालयावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने १२ जून या दिवशी धाड टाकली. या प्रसंगी रुग्णालयाच्या व्यवस्थापकास गर्भलिंग निदान चाचणीसाठी १५ सहस्र रुपये घेतांना रंगेहात पकडण्यात आले. या संदर्भात कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागास एका महिलेची तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रमेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचणीचा पुन्हा पर्दाफाश
गर्भलिंग निदानासाठी 15 हजार घेताना रंगेहाथ कारवाई#janpravas #janpravaslive #JANPRAVS_LIVE #maharashtra #maharashtranews #kolhapur #sex #determination #busted #kmc #caught #redhanded #taking #15thousand #sexdetermination pic.twitter.com/Qj5i36XWZ3— JanpravasLive (@JanpravasKop) June 12, 2023
सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांत गर्भलिंग चाचणी करण्याच्या घटना यापूर्वीही मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गर्भलिंग निदान करणार्या टोळीला राधानगरी पोलिसांनी अटक केली होती. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातही अशीच घटना उघडकीस आली होती.