काँग्रेसच्‍या आमदाराला ९९ रुपयांचा दंड !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र फाडल्‍याच्‍या प्रकरणी येथील न्‍यायालयाने काँग्रेसचे आमदार अनंत पटेल यांना ९९ रुपयांचा दंड ठोठावला. पटेल यांनी दंड भरला नाही, तर त्‍यांना ७ दिवसांचा कारावास भोगावा लागू शकतो.

अधिवक्‍ते गुणरत्न सदावर्ते यांची सनद २ वर्षांसाठी रहित

राज्‍य परिवहन मंडळाच्‍या कर्मचार्‍यांच्‍या आंदोलनात आणि बैठकीत अधिवक्‍त्‍यांचा काळा कोट अन् बँड घालून गेल्‍या प्रकरणी अधिवक्‍ते गुणरत्न सदावर्ते यांच्‍यावर महाराष्ट्र-गोवा बार कौन्‍सिलने शिस्‍तभंगाची कारवाई करून यांची सनद २ वर्षांसाठी रहित केली आहे.

कांदळी (जिल्‍हा पुणे) येथे संताच्‍या वंदनीय उपस्‍थितीत हनुमान मूर्तीची प्रतिष्‍ठापना !

‘श्री रामचंद्र देव ट्रस्‍ट’ आणि ‘प.पू. भक्‍तराज महाराज समाधी ट्रस्‍ट’ यांच्‍या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.

#Exclusive : कराड (जिल्‍हा सातारा) बसस्‍थानकावर तंबाखूच्‍या पिचकार्‍यांनी रंगलेल्‍या अस्‍वच्‍छ भिंती !

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा ! राज्य परिवहन मंडळाने बसस्थानकांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात आणि शासनाने राज्य परिवहन मंडळाच्या अडचणी समजून त्या सोडवणे आवश्यक आहे.

गुढीपाडव्‍यानिमित्त गोवा दूरदर्शनवर सनातनच्‍या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत

गोवा दूरदर्शनवर गुढीपाडव्‍याच्‍या निमित्ताने  आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात सनातन संस्‍थेच्‍या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत घेण्‍यात आली. या मुलाखतीत सौ. गरुड यांनी गुढीपाडव्‍याविषयी सविस्‍तर माहिती दिली.

महाराष्‍ट्र राज्‍य मानवाधिकार आयोगातील ५० टक्‍के पदे रिक्‍त !

ही रिक्‍त पदे तातडीने भरून न्‍यायदानाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणे अपेक्षित !

ठाणे मनसे अध्‍यक्ष अविनाश जाधव यांना मुंब्‍य्रात बंदी !

परिसर संवेदनशील का झाला, याकडे दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकाम हटवण्‍यास सांगणार्‍यांवरच कायद्याचा बडगा उगारण्‍यात येतो. हिंदुत्‍वनिष्‍ठ शासनाच्‍या काळात नेमके कसे असायला हवे ?, हे आता जनतेने ठरवायला हवे !

शासकीय कार्यालयांमध्‍ये नागरिकांसाठी वेळ निश्‍चित होणार, मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आदेश लागू !

आठवडा, पंधरवडा किंवा मासातून ठराविक वेळ निश्‍चित करावा. शक्‍यतो दुपारी २.३० ते ३.३० ही समान वेळ असावी. या वेळेत शक्‍यतो दौर्‍यांचे नियोजन करण्‍यात येऊ नये, असे आदेशत म्‍हटले आहे.

सीरियातील तरुणीकडून नवी मुंबईतील एकाची फसवणूक !

त्‍या तरुणीने कधी कस्‍टम ड्युटी, कधी आयकर विभाग भरणा, तर कधी कस्‍टम सर्विस चार्जेस अशा प्रकारे पैशांची मागणी केली होती. सामाजिक संकेतस्‍थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा !

सावरकर गौरव यात्रा !

‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’सह त्‍यांचे अखंड हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचे स्‍वप्‍नही साकार करावे, ही अपेक्षा !