९ लाख ४३ रुपयांना फसवले
नवी मुंबई – सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून नवी मुंबईतील एका व्यक्तीची सीरिया या देशात रहाणार्या जेनी बार्टली या तरुणीशी ओळख झाली. तिने भेट म्हणून १ लाख डॉलर पाठवले. त्याचे पार्सल कस्टममधून सोडवून घेण्यासाठी संबंधिताने ९ लाख ४३ रुपये भरले; मात्र पैसे न मिळाल्याने त्याचे फसवणुकीची तक्रार प्रविष्ट केली. त्यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला.
त्या तरुणीने कधी कस्टम ड्युटी, कधी आयकर विभाग भरणा, तर कधी कस्टम सर्विस चार्जेस अशा प्रकारे पैशांची मागणी केली होती. विविध बँकेच्या खात्यांचे क्रमांक देण्यात आले होते. त्यातून तिने संबंधित व्यक्तीला फसवले आणि नंतर संपर्क न्यून केला.
संपादकीय भूमिकासामाजिक संकेतस्थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा ! |