पुणे – देशासह राज्यात इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान योजना राबवण्यात येत आहे. या अंतर्गत पुणे महापालिकेच्या वतीने ई-रिक्शात रूपांतर करण्यासाठी २५ सहस्र रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. तसेच ई-रिक्शांच्या चार्जिंगसाठी चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार आहेत. यापूर्वी ऑटो रिक्शांना ‘सी.एन्.जी. किट’ बसवण्यासाठी महापालिकेकडून १२ सहस्र रुपयांचे अनुदान देण्यात येत होते.