बुद्धीच्या पलीकडे असलेले सूक्ष्म जग !

‘सागराकडे पाहून त्याचा बुद्धीने अभ्यास करायचा म्हटले, तर त्याची खोली आणि तेथील विविध गोष्टी कळत नाहीत. त्याचप्रमाणे स्थूल गोष्टींचा बुद्धीने अभ्यास करून अध्यात्मातील सूक्ष्म जग कळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चर्चचे अनधिकृत बांधकाम महापालिकेकडून उद्ध्वस्त !

सिवूड येथील बेथेल गॉस्पेल चर्चद्वारे चालवण्यात आलेल्या अवैधपणे बालाश्रमामध्ये ४ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. या चर्चचे अनधिकृत बांधकाम नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांनी संयुक्त विद्यमाने कारवाई करून उद्ध्वस्त केले.

‘हिंदु मतपेटी’ निर्माण करा ! – पू. कालिचरण महाराज

जात, प्रांत अन् भाषा विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून संघटित होऊन ‘हिंदु मतपेटी’ निर्माण करावी, असे आवाहन हिंदू धर्मजागरण महासभेचे पू. कालिचरण महाराज यांनी केले.

महाराष्ट्रात फूट पाडण्याचा कर्नाटक सरकारचा डाव ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठामंत्री

सीमाभागातील सांगली जिल्ह्यातील जत येथे कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक पाणी सोडत आहे. असे करून महाराष्ट्रात फूट पाडण्याचा कर्नाटक सरकारचा डाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक सरकार असे जाणीवपूर्वक करत आहे.

अमरावती येथे इज्तेमाच्या काळात गोहत्या होऊ नयेत, याची काळजी प्रशासनाने घ्यावी ! – सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना, अमरावती

काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात गोवंश घेऊन जाणारी वाहने वाढली आहेत. याची पुराव्यासहित माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वेळोवेळी प्रशासनाला दिलेली आहे.

राज्यात प्लास्टिक आणि थर्माेकॉल यांच्या वस्तू प्रमाणित आहेत का ? याची खात्री करणे बंधनकारक !

आवरणासाठी (पॅकिंग) वापरण्यात येणारे प्लास्टिक ५० मायक्रॉनपेक्षा अधिक, तर नॉन ओव्हन पॉलीप्रापीलिन बॅग्स ६० ग्रॅम प्रति चौरस मीटर (जी.एस्.एम्.) पेक्षा अधिक जाड असायला हवे, अशी अधिसूचना महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आली आहे.

विश्वविघातक प्रदूषण रोखा !

प्रदूषणाच्या वाढत्या भस्मासुराचा सामना करण्याचे मोठे शस्त्र हिंदु धर्मातील ऋषिमुनींनी ‘अग्निहोत्रा’च्या माध्यमातून आपल्याला आधीच उपलब्ध करून दिले आहे. अग्निहोत्रातून उत्पन्न झालेल्या धुराने वायूचे शुद्धीकरण होऊन हानीकारक विषाणूंचा नाश होतो. त्याचा अवलंब वैश्विक स्तरावर होण्याच्या दृष्टीने भारत सरकारने प्रयत्न करावेत.

अनधिकृत होर्डिंगमुळे तुर्भे परिसराला बकाल स्वरूप !

विविध राजकीय पक्ष आणि संस्था यांच्या अनधिकृत होर्डिंगमुळे (फलकांमुळे) तुर्भे-वाशी परिसराला बकालपणा आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा परवाना विभाग, तसेच विभाग कार्यालय यांच्याकडून कोणतीही अनुमती न घेता हे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत.