जळगाव येथे दोन दिवसांच्या ग्रंथोत्सवाचे आयोजन !

ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २८ आणि २९ नोव्हेंबर या कालावधीत ‘ग्रंथोत्सव २०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे.

शिखर शिंगणापूर (सातारा) येथे आढळला शहाजीराजे यांचा शिलालेख !

येथील महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूने तटबंदी आहे. या तटबंदीला अनेक खांब आहेत. त्यातील एका खांबावर कोरीव शिलालेख आढळला आहे.

अमली पदार्थ तस्करी करणार्‍या रेल्वे पोलीस दलातील अधिकार्‍यासह शिपाई बडतर्फ !

कुंपणच शेत खायला लागले, तर दाद कुणाकडे मागायची ?, अशी स्थिती झालेले पोलीस दल !

सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी उघड्यावर मद्यपान !

परिसरात उघड्यावर मद्यपान करणार्‍यांवर पोलीस प्रशासनाचा कसलाही वचक नाही, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? या प्रकाराकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक तर करत नाही ना ?

सीमाप्रश्नामुळे महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतील बससेवा विस्कळीत !

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद चालू असल्याने नगरहून गाणगापूरकडे जाणारी १ बस कर्नाटकच्या सीमेवर थांबवण्यात आली होती. या बसमध्ये ४८ प्रवासी होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.

मुंबई महानगरक्षेत्रात गोवरच्या रुग्णांत वाढ !

मुंबईतील ९ मास ते ५ वर्षे वयोगटातील ३३ आरोग्य केंद्रातील एकूण १ लाख ३४ सहस्र ८३३ बालकांना गोवर रूबेला लसीची विशेष मात्रा देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची ‘तीर्थक्षेत्र बचाव समिती’ समवेत बैठक !

‘कॉरिडॉर’ची (विकास आराखड्याची) कार्यवाही करतांना स्थानिक आणि बाधित नागरिक अन् व्यापारी यांना विश्वासात घेतल्याविना काहीही होणार नाही. सर्व नागरिकांच्या सूचनांचा १०० टक्के विचार करूनच पुढील निर्णय घेतले जातील.

पारपत्रासाठी बनावट कागदपत्र सादर करणार्‍या २ धर्मांधांसह तिघांना अटक !

पारपत्रासाठी आईच्या जन्माचा बनावट दाखला देऊन फसवणूक केल्याप्रकरणी २ धर्मांधांसह तिघांना मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुख आझाद शेख, शाबाज हसीन अहमद खान आणि सूरज सावजयकर अशी त्यांची नावे आहेत.

पी.एम्.पी.एम्.एल्.च्या वतीने पुणे येथे १९ मार्गांवर ‘महिला विशेष बस’ योजना !

महिलांचा पी.एम्.पी. बसमधून होणारा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. पी.एम्.पी. प्रशासनाने महिला प्रवाशांकरिता ‘महिला विशेष बस’ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २८ नोव्हेंबरपासून शहरातील १९ मार्गांवर २४ बस धावणार आहेत.

युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव !

काश्मीर खोर्‍यामध्ये भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह विकासकामांत योगदान देत असल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांना भारतीय सैन्य दलाकडून प्रशंसा प्रशस्तीपत्रक देण्यात आले.