जळगाव येथे दोन दिवसांच्या ग्रंथोत्सवाचे आयोजन !

जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. सुहास रोकडे

जळगाव, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २८ आणि २९ नोव्हेंबर या कालावधीत ‘ग्रंथोत्सव २०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवात ग्रंथप्रदर्शन, विक्री आणि साहित्यिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकासमंत्री मा. गिरीश महाजन हे अध्यक्ष, तर पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील हे उद्घाटक म्हणून लाभले आहेत. या ग्रंथोत्सवाला विविध मंत्री, आमदार, खासदार आणि मान्यवर यांची उपस्थिती लाभणार आहे.

ग्रंथोत्सवाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने होणार असून ग्रंथदिंडीचे पूजन महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते होईल. व्याख्यान, परिसंवाद आणि खान्देशी बोलीभाषेतील कवीसंमेलन यांचेही आयोजन करण्यात आले आहे. जास्तीतजास्त रसिकांनी ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. सुहास रोकडे यांनी केले आहे.