पारपत्रासाठी बनावट कागदपत्र सादर करणार्‍या २ धर्मांधांसह तिघांना अटक !

गुन्हेगारीत धर्मांध पुढे !

मुंबई – पारपत्रासाठी आईच्या जन्माचा बनावट दाखला देऊन फसवणूक केल्याप्रकरणी २ धर्मांधांसह तिघांना मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुख आझाद शेख, शाबाज हसीन अहमद खान आणि सूरज सावजयकर अशी त्यांची नावे आहेत. शाहरुख याने पारपत्रासाठी केलेल्या अर्जाला जोडण्यात आलेल्या कागदपत्रांची पोलिसांनी पडताळणी केली. यामध्ये त्याने आईच्या जन्मदाखल्याची बनावट प्रत अन्य आरोपींच्या साहाय्याने सादर केल्याचे उघडकीस आले होते.