अमली पदार्थ तस्करी करणार्‍या रेल्वे पोलीस दलातील अधिकार्‍यासह शिपाई बडतर्फ !

मुंबई – अमली पदार्थ तस्करीप्रकरणी रेल्वे पोलीस दलातील अधिकार्‍यासह शिपाई यांना लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी बडतर्फ केले आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश वसेकर आणि पोलीस शिपाई रवी विशे अशी त्यांची नावे आहेत.

ठाणे शहराच्या गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने १५ नोव्हेंबर या दिवशी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना अमली पदार्थांची तस्करी करतांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून २ लाख रुपये किंमतीचे ९२१ ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले होते. सध्या दोघेही पोलीस कोठडीत आहेत. ठाणे पोलिसांनी केलेल्या चौकशीत अमली पदार्थ विक्रीसाठी या दोघांनी काही जणांसह संभाषण आणि व्यवहार केल्याचा पुरावा उपलब्ध झाला आहे.

संपादकीय भूमिका 

कुंपणच शेत खायला लागले, तर दाद कुणाकडे मागायची ?, अशी स्थिती झालेले पोलीस दल !